मौजे आन्वी गावातील अवैध दारू विक्री बंद करा; देवेश ढाकणे व उमेश कुटे यांच जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन
प्रतिनिधी जालना

मौजे आन्वी गावातील अवैध दारू विक्री बंद करा; देवेश ढाकणे व उमेश कुटे यांच जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन
बदनापुर तालुक्यातील आन्वी गावातील अवैध दारू विक्री ही एक गंभीर समस्या बनली आहे. या गावातील नागरिकांचे जीवन अवैध दारू विक्रीमुळे कठीण होत चालले आहे. भारतीय जनता पार्टी चे देवेश ढाकणे व जय बजरंग फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी जिल्हाधिकारी जालना व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जालना यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी.आन्वी गावातील अवैध दारू विक्री ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे गावातील नागरिकांचे संसार रस्त्यावर आले आहे. भारतीय जनता पार्टी चे देवेश ढाकणे व जय बजरंग फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी जिल्हाधिकारी जालना व राज्य उत्पादन शुल्क अध्यक्ष या समस्येचे निदर्शनास आणून दिले आहे आणि तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग होत आहे आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाकडून या समस्येवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी चे देवेश ढाकणे व उमेश कुटे जिल्हा अध्यक्ष जय बजरंग फाउंडेशन यांच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी यांनी कठोर कारवाई करून अवैध दारू विक्री बंद करण्यात यावा यासाठी निवेदन दिले
.यावेळी अक्षय भोसले, देवेश ढाकणे , उमेश कुटे( जिल्हाध्यक्ष जय बजरंग फाउंडेशन ) भरत ढाकणे, भास्कर ढाकणे, अश्विन ससाने, कृष्णा ढाकणे व इतर..