मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे सोनार समाजाच्या 3 वर्षीय चिमुकलीचा बलात्कारानंतर खून करण्यात आल्याच्या घटनेबाबत जय बजरंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्याने तीव्र निषेध व्यक्त केला

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे सोनार समाजाच्या 3 वर्षीय चिमुकलीचा बलात्कारानंतर खून करण्यात आल्याच्या घटनेबाबत जय बजरंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्याने तीव्र निषेध व्यक्त केला 
. *यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले असून या घटनेचा वेगवान आणि निष्पक्षपातीपणे तपास* *करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावी, कठोर कायदा निर्माण करण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावेत, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत प्रदान करावी आणि या प्रकरणाची सुनावणी शासकीय वकील म्हणून उज्वल निकम यांच्या मार्फत करावी, तसेच पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण प्रदान करावे*. *भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदा निर्माण करून त्याची अमलबजावणी करावी, जेणेकरून अशा दृष्ट प्रवृत्तीला समाजात भीती व धाक निर्माण होईल आणि अशा घटनांना आळा घातला जाईल* *या निवेदनावर
संस्थापक अध्यक्ष विपुल राय, डॉ.अतुल राय, उपअध्यक्ष विनोद राऊत, सचिव अशोक पडोळ, कोषाध्यक्ष शेषराव जाधव, जिल्हाध्यक्ष उमेश कुटे, शहराध्यक्ष किशोर कुरील, सचिन घोडे, अश्विन ससाने, गजानन खोतकर, माऊली कळमकर, बाबू भोसले आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत*