छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७,६३८ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
मुख्य संपादक शिवाजी सुतार 7387418290

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७,६३८ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आज दि. २२ जुलै रोजी मातोश्री हॉल, बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले.
माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तासगाव–कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. रोहित सुमन आर. आर. आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 6 श्री. समाधान शेंडगे, तहसीलदार कवठेमहांकाळ श्रीमती अर्चना कापसे, तहसीलदार तासगाव श्री. अतुल पाटोळे, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज व तक्रारींचा तत्परतेने निपटारा करण्यात आला. या अभियानांतर्गत एकूण ७,६३८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
लाभार्थ्यांचा योजनानिहाय आढावा
महसूल समाधान शिबीर – योजनानिहाय लाभार्थी
दि. २२ जुलै २०२५, बोरगाव ता. कवठेमहांकाळ
1.राज्य शासनाच्या योजना 5,401
2.केंद्र शासनाच्या योजना 1,586
3.जिवंत सातबारा मोहिम 543
4.इतर लाभ 53
5.महिला शेतकरी सन्मानपत्र 25
6.घरकुल योजना 12
7.गावठाण स्वामित्व 9
8.मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 9
याशिवाय विविध महसुली योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण करून शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या अभियानातून साध्य करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने कार्य करत शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले.
शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
(अर्चना कापसे)
तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ



