*जय बजरंग फाउंडेशनच्या वतीने हनुमान चालीसा व लाडूवाटप* हनुमानांचा आदर्श युवक, बालकांना कळावा, हेतूने उपक्रम
जालना (प्रतिनिधी)

जन्मोत्सवानिमित्त जय बजरंग फाऊंडेशनच्या वतीने जालना शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालीसा व लाडूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी
फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल राय, उपाध्यक्ष विनोद राऊत, सचिव अशोक पडूळ, कोषाध्यक्ष शेषराव जाधव, सल्लागार अरविंद देशमुख, सल्लागार धनसिंग सूर्यवंशी, संतोष कराळे, लक्ष्मण उढान, जिल्हाध्यक्ष उमेश कुटे, शहराध्यक्ष किशोर कुरील, शहर सचिव राजसिंग ठाकूर, अश्विन ससाने, तोशू सिंग, संतोष सिंग, सिद्धांत मोर मनोज गुडेकर, गणेश पवार, यांच्यासह पदाधिकारी, युवक आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमानाचा आदर्श युवक,बालकांना कळावा, हनुमान चालीसांचे पठण केल्यामुळे होणारे फायदे समजून मुखोद्रत व्हावे, या हेतूने हनुमान जन्मोत्सव निमित्त जय बजरंग फाउंडेशनच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला.



